मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

प्रथम पुन:स्मरण – बाळ केशव ठाकरे

(23 जानेवारी 1926- 17 नोव्हेंबर 2012)
बाळ केशव ठाकरे……जग मात्रत्यांना ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावानं. गेली 41 वर्षया नावानं मराठी मनावर गारुड केलंय. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला शेकडो तरुण तयार असतात. हे तुफान शांत झालंय. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी मातोश्रीवर अखेरचा श्वास घेतला. लाखो शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब सगळ्यांना सोडुन गेलेत त्या घटनेला आज एक वर्ष पुर्ण होत आहेत.
बाळकेशव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळशिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेना प्रमुख असलेल्या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात 1950 ला ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून झाली. या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्र खूपच गाजली. पुढे वैशिष्ट्य ठरलेल्या त्यांच्या तिरकस भाषण शैलीचं मुळ त्यांच्याया भुतकाळात आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक मोठं नाव. त्यामुळे पुरोगामित्व आणि सामाजिक जाणिवेचा वसा त्यांना घरातूनच मिळाला. शिवसेनेच्या स्थापनेपुर्वी त्यांच्या जीवनातला एक महत्वाचाटप्पा म्हणून मार्मिक या साप्ताहिकाचा उल्लेख करावा लागेल. 1960 साली बाळा साहेबांनी सुरू केलेल्या या व्य्ंगचित्र साप्ताहिकातलंवाचा आणि स्वस्थ बसाहे सदर तर त्या काळी खूपच गाजलं. या साप्ताहिकानं एक वेगळंच राजकीय वातावरण तयार केलं. 19 जून 1966 साली भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली.
मराठी माणसाला होत असलेला त्रास हा प्रमुख मुद्दा शिवसेनेनं हिरीरीनं मांडला. सुरूवातीच्या काळात एक सामाजिक संघटना असलेल्या शिवसेनेचंपुढे राजकीय पक्षात रुपांतर झालं. 1985 नंतरच्या काळात हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची भूमिका प्रखर करत शिवसेनेनं राजकारणावर भर दिला. 1995 ते 99 हा काळ बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्वाचा काळ म्हणावा लागेल.शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्र विधानसभेत सत्तेवर आलं. आणि बाळासाहेब होते या सरकारचे रिमोट कंट्रोल. त्यांच्या शब्दांना तलवारीसारखी धार होती. म्हणूनच त्यांच्या वक्तृत्वानं आणि लेखणीनं अनेकांना घायाळ केलं. लाखो तरुणांना शिवसेनेच्या झेंड्याखाली आणलंमहाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांना टाळूनपुढे जाता येणार नाही. गेल्या पाच दशकात बाळासाहेबांनी अनेक वादळांचा सामना केला.
बाळासाहेबांचा जीवनप्रवास
1945 – फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू
1960 –
मार्मिक साप्ताहिक सुरू
19
जून 1966 – शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन तीव्र
14
ऑगस्ट 1967 – शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे महापालिका ताब्यात घेतली
26
मार्च 1968 – शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा
1970 –
वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार विधानसभेवर
1973 –
सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 –
दादरला सेनाभवनाचं उद्घाटन
1986 –
पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23
जानेवारी 1989 – शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू
1989 –
लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती
1990 –
पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध, शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं
1991 –
छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 –
अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा
1995 –
विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री
सप्टेंबर 1996 – मीनाताई ठाकरेंचा मृत्यू
1999 –
केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत शिवसेनेचे 15 खासदार
जुलै 1999 – निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक लढवायला 5 वर्षांची बंदी
2007 –
बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं
2002
ते 2004 – लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे मनोहर जोशी
18
डिसेंबर 2005 – राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली
2011 –
बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा
युतीच्या काळातले महत्त्वाचे निर्णय
मोफत घरं
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे
मुंबईतले फ्लायओव्हर्स
खाजगी वाहिन्यांचे दर
नफ्यातल्या सरकारी तेल कंपन्यांच्या विक्रीला विरोध
मुंबईतले लोंढे थांबवण्यासाठी परवाना लागू करण्याचा प्रयत्न वादग्रस्त ठरला
झुणका-भाकर केंद्रामुळे मराठी माणसाला व्यवसायभिमुख बनविण्याचा प्रयत्न
क्रिकेटचे चाहते - क्रिकेटचे निस्सिम चाहते, वानखेडे स्टेडियमच्या उभारणीच्या वेळी झालेला विरोध मोडून काढला. वानखेडेला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा दिला. बापू नाडकर्णी, माधवमंत्री, पॉलि उम्रीगर यांचे लोकल मधले सहप्रवासी. बाळासाहेब फ्रीप्रेसमध्ये तर क्रिकेटर चर्चगेट येथील एसीसी सिमंटमध्ये कामाला. याच लोकलप्रवासात बाळासाहेबांनी बापू नाडकणीर्ंचा भारतीय टेस्ट टीममधला प्रवेशसाजरा केला होता. त्यावेळी लोकल ट्रेन मध्ये बाळासाहेबांनी बापू नाडकर्णीयांना खास व्यंगचित्र भेट दिलं होतं. आजही ते व्यंगचिंत्र बापू नाडकर्णी यांनी जपून ठेवलंय.

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा