नागपूर,
दि.
२१
(प्रतिनिधी)
- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे
यांचे
कार्य
अलौकिक
असून
ते
वंदनीय
आहेत,
अशा
शब्दांत
ख्यातनाम
पार्श्वगायिका
आशा
भोसले
यांनी
आज
आपल्या
भावना
व्यक्त
केल्या.
नागपूर
महोत्सवासाठी
आलेल्या
आशाताईंनी
पत्रकारांशी
संवाद
साधला.
त्यांनी
शिवसेनाप्रमुखांचा एक
किस्साच
ऐकवला.
त्या
म्हणाल्या,
‘‘एकदा
बाळासाहेबांनी मला
भेटायला
बोलावले
होते.
मात्र
मला
जाण्यास
उशीर
झाल्याने
त्यांनी
शिवसैनिकांना
मला
उचलून
आणायला
सांगितले
होते.
मी
बाळासाहेबांना याबद्दल
विचारले
असता
ते
मिष्कीलपणाने
म्हणाले
होते,
अगं,
भोसले
गढीतून
बाहेर
निघत
नसतील
तर
त्यांना
उचलून
आणावेच
लागते.’’
आजच्या
काळात
सूर
आणि
तालावर
गाणी
लिहिली
जातात,
ती
अनेकदा
अर्थहीन
असतात,
अशी
खंतही
आशा
भोसले
यांनी
व्यक्त
केली.
ताकदीचे
कवी
नाहीत
आणि
नव्या
पिढीत
नाव
घ्यावे
असे
दमदार
गायकही
नाहीत,
असेही
त्या
म्हणाल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा