शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ....

www.24taas.com, मुंबई बाळासाहेब आणि शिवतीर्थ याचं नातं हे जन्मजन्मांतरीचं.... एकच नेता, एकच मैदान... हा नारा देत... बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक... हेच दृष्य म्हणजे बाळासाहेबांची खरी संपत्ती... कसा झाला बाळासाहेबांचा प्रवास शिवतीर्थ ते शिवतीर्थ पाहूया.... पहिला दसरा मेळावा- 30 ऑक्टोबर 1966 - 19 जून 1966 रोजी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना झाली आणि या पक्षाचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ऐतिहासिक शिवाजी पार्कवर झाला. याच मैदानावर गेली 46 वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो मराठी भाषिकांना मार्गदर्शन करीत आगामी वाटचालीची दिशा दिली. बाळासाहेब... शिवसैनिकाचा श्वास आणि मराठी मनांचा ध्यास असणारे बाळासाहेब... केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकारांचा हा मुलगा... अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या, समाजाच्या दांभिकपणावर प्रहार करणाऱ्या आणि प्रबोधनातून समाजकल्याण हे एकमेव ध्येय असणाऱ्या प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांनी नुसताच समर्थपणे पेलला नाही, तर प्रबोधनकारांचा संस्कार महाराष्ट्राच्या घराघरात रुजवला... म्हणूनच बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी जीवावर उदार होणारे हजारो मावळे या महाराष्ट्रात तयार झाले... १९ जून १९६६ ला शिवसेनेचा जन्म झाला... दृढनिश्चयी आणि निर्भीड सेनापतीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. पण त्याआधी व्यंगचित्रांमधून ही चळवळ आकाराला येत होती. तरुण तडफदार बाळासाहेबांची १९५० च्या दशकातली फ्री प्रेस जर्नलमधली व्यंगचित्रं राजकारणावर रोखठोक भाष्यं करत होती... रेषांचे फटकारे अचूक काम करतायत, हे बाळासाहेबांना वेळीच उमगलं आणि जन्म झाला मार्मिकचा... भारतात महाराष्ट्राला मानाचं स्थान होतं. पण मुंबईत मात्र मराठी माणसाला आदर मिळत नव्हता... या न्यूनगंडाखाली पिचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांच्या मार्मिकनं खडबडून जागं केलं आणि मराठी माणसाच्या न्यूनगंडाचं रुपांतर अभिमानात झालं. हा चमत्कार घडवला तो बाळासाहेबांच्या सडेतोड रेषांनी... व्यंगचित्रांमुळे मराठी माणूस जागा होईल पण संघटित होणार नाही, हे बाळासाहेबांनी ओळखलं आणि १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवतीर्थावर ३० ऑक्टोबर १९६६ ला शिवसेनेचा पहिला मेळावा झाला. या पहिल्यावहिल्या मेळाव्याला पाच लाख लोक उपस्थित होते... मराठी बाणा घेऊन राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेची घोडदौड सुरू झाली. मराठी लोकांचे प्रश्न, मराठी माणसाचा रोजगार, मराठी विरुद्ध परप्रांतीय, हिंदुत्व सीमाप्रश्नाबद्दल बाळासाहेबांनी ठाकरी शैलीत आवाज उठवला आणि महाराष्ट्रात बाळासाहेब नावाचं वादळ घोंगावू लागलं. मराठी माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्रश्नांना संघटित रुप मिळालं आणि लढा सुरू झाला मराठी माणसाच्या हक्कासाठी. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता स्थानिकांच्या रोजगाराचा... देश स्वतंत्र झाल्यावर नवं अर्थकारण आकार घेत होतं, मुंबईत दाक्षिणात्यांचं वाढलेलं प्रमाण मराठी माणसावर शिरजोर होत होतं... स्थानिकांना रोजगार मिळत नव्हता... रोजगारातला ८० टक्के वाटा स्थानिकांचा असावा, ही शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका... दाक्षिणात्यांविरोधात रोष वाढत असताना शिवसेनेनं नारा दिला हटाव लुंगी, बजाव पुंगी... आंदोलनाला जोर चढला आणि दाक्षिणात्य लोकांना खरोखरच लुंगी सावरत मुंबईतून पळ काढावा लागला. परप्रांतीयांविरोधातलं हे मुंबईतलं पहिलं आंदोलन... हाच परप्रांतीय मुद्दा पुढच्या काळात राजकारणाचा हुकमी एक्का बनला. महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठीशी वैर करुन चालणार नाही, हा दट्ट्या सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं घालून दिला. त्याकाळी इतर भाषांमध्ये असलेल्या दुकानांच्या पाट्यांवर शिवसैनिकांनी काळं फासायला सुरुवात केली. आंदोलनांनी अपेक्षित परिणाम साधला आणि मुंबईत दुकानांवरच्या पाट्या मराठीत दिसायला लागल्या. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं वाचा फोडली. त्याहीआधी सीमाप्रश्नावरुन मार्मिकमध्ये बाळासाहेबांचे फटकारे सुरूच होते. सीमाभागातल्या मराठी बांधवांच्या व्यथा शिवसेनेनं जाणल्या. सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी मोरारजी देसाईंच्या काळात सीमाप्रश्नाचं आंदोलन चांगलंच चिघळलं. शिवसैनिकांनी मोरारजी देसाईंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तरीही मोरारजी देसाईंनी गाडी पुढं नेल्यानं शिवसैनिक चिडला. आंदोलन इतकं पेटलं की ५२ शिवसैनिकांचा या आंदोलनात बळी गेला. दुर्दैवानं आजही सीमाप्रश्न प्रलंबितच आहे. यंत्रयुगानं गिरणी काम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा