शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

…आणि बाळासाहेबांनी `दर्शन’ दिले



मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी पसरताच अवघ्या महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईकडे धाव घेतली. रविवारी सकाळी 7.30 वा. मातोश्रीहून निघणार्या अंत्ययात्रेत आपणही सहभागी व्हावे या उद्देशाने रात्रीपासूनच त्यांच्या चाहत्यांनी मातोश्रीबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र  अंत्ययात्रा निघण्यास तब्बल दोन तास उशीर झाला आणि गर्दीचे रूपातर जनसागरात झाले. `बाळासाहेब अमर रहे’ या घोषणेने कलानगर नव्हे तर संपूर्ण मुंबई दणाणून गेली. मराठी माणसाच्या हृदयाचा ठोका असणार्या आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना मुंबईकरांच्या डोळ्यातून ज्या आश्रंyचा धारा वाहत होत्या, त्यावरुन जणू मुंबईत आश्रंyचा महापूर आला असेच वाटत होते.
सकाळी 7.30 वा. मातोश्रीहून निघणारी अंत्ययात्रा तब्बल दोन तास उशिरा म्हणजे  9.30 वा. निघाली. अंत्ययात्रा निघण्यापूर्वी शासकीय इतमामात पोलिसांनी बाळासाहेबांना मानवंदना दिली. त्यानंतर असंख्य शिवसैनिकांच्या साक्षीने बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लाखो अनुयायांबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीही नजरेत पडत होती ती फक्त शिवसैनिकांचीच गर्दी. `कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाध आला,’ अशी घोषणाबाजी आणि फुलांचा वर्षावर करत चहात्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
कलानगर, माहीम काजवे, शितला देवी मंदिर, सेना भवन या ठिकाणांहून बाळासाहेबांची अंत्ययात्रा 3.15 मिनिटांनी शिवसेनाभवनाजवळ येऊन पोहोचली. नंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर पोहोचली. शिवाजी पार्कवर साहेबांचे दर्शन योग्य प्रकारे घेता येणार नाही, म्हणून शिवसैनिकांसह बाळासाहेबांना मनापासून मानणार्या असंख्य लोकांनी सकाळपासूनच सेनाभवनाबाहेर तळ ठोकला होता. सेनाभवनाजवळ अंत्ययात्रा पोहोचताच `बाळासाहेब अमर रहे’, `बाळासाहेबर परत या’  या घोषणांनी सेनाभवन परिसर दणाणला. सेनाभवन परिसरातील इमारती, झाडे, चाळींचे छत आणि मिळेल त्या ठिकाणी बाळासाहेबांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जागेचा ताबा घेतलेला दिसून येत होता. तर आपल्या कॅमेरात बाळासाहेबांचे फोटो व्यवस्थित टिपता यावेत यासाठी छायाचित्रकारांनीही सेना भवनाजवळील भिंतीवर ताबा मिळविल्याचे पाहायला मिळत होते. सेना भवनाकडे येणार्या प्रत्येक रस्त्यावर, इमारतींवर दुष्टीस पडत होतो तो फक्त बाळासाहेबांचा अनुयायीच. सेनाभवनसमोर बांधाकम सुरू असलेल्या कोहिनूर स्कॅवेअर टॉवरच्या पहिल्या मजल्यापर्यंत दुष्टीत पडत होता तो बाळासाहेबांचा चहाता वर्ग. बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी सेना भवन परिसारत ठाण मांडून बसलेल्यांमध्ये मुंबईकरच नव्हेत तर नाशिक, नागपूर, रायगड, पुणे आदी ठिकाणांहून त्यांचे चाहते जमा झालेले पाहायला मिळत होते. एकूणच बाळासाहेब हयात असताना शिवसैनिकांचे जे प्रेम त्यांच्यावर होते तेवढेच प्रेम आज त्यांच्या निधनानंतरही पाहावयास मिळाले ही फार मोठी गोष्ट असून मराठी माणसाने आज एक मराठी नेता गमावला असे शब्द कानी पडत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा