मंगळवार, २० जानेवारी, २०१५

मराठी भाषा आणि बाळासाहेब एक आठवण....किशोर सोनावणे:-(गर्जा महाराष्ट्र न्युज)

गेली ४७ वर्षे मराठी माणुस आणि देशभरातील हिदुंच्या मनावर आधीराज्य गजवणारे “हिंदु हृदयसम्राट” मानले जाणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब. पैसा न देता लाखोंचा जनसागर एकटवण्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड्स मोडुन एक नेता, एक मैदान, एक पक्ष आणि एकचं झेंडा असे समीकरण मांडणारी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शिवरायांचा कट्टर मावळा म्हणुन जन्माला आलेली व्यक्ती म्हणजे बाळासाहेब. संपुर्ण रसातळाला गेलेल्या मराठीला अस्तीत्वात आणनारी व्यक्ती म्हणजे बाळसाहेब. ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य या मराठ मोळ्या मातीसाठी आणि महाराजांच्या हस्ते स्थापीत झोलेल्या हिंदवी स्वराज्याची मान राखण्या साठी घालवले.
      १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र् राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील मागील ५२ वर्षातील सगळ्यात मोठी राजकीय घटना म्हणजे १३ जुन १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुरुवातीला ही एक सामाजीक घटना असल्याचे समजत होते परंतु तो विषय फक्त सांगण्यापुरता होता. परंतु शिवसेना ही पक्षीय संघटना म्हणुन स्थापन झाली. बाळासाहेबांच्या पहील्या भाषणात सामाजीक शब्दांचा उल्लेख तर होताच परंतु संयुक्त महाराष्ट्र निर्मीती नंतरच्या काळात मराठी तरुणांची नोकरीत होणारी कोंडी व व्यापारात परप्रांतीयांचे वाढते बळ व वर्चस्व हा शिवसेना स्थापन करण्यामागचा हेतु होता.
मराठी माणसाला एकत्र करुन त्यांना नोकऱ्या मिळवण्या साठी आक्रमक करणे व मध्य मुंबईतील कम्युनीस्ट पक्षाच्या कामगार संघटनांचे वर्चस्व मोडुन मराठी माणसाची ताकत वाढवुन मराठीचे अस्तीत्व टिकवणे हेच होते. हे सुरवातीला जाहीर झाले नाही परंतु ते कुणापासुन लपुनही नव्हते.
     १९६६ हा शिवसेना स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुंबई झपाट्याने वाढत होती. साऊथच्या हॉटेलांविरुद्ध उडपी हॉटेलच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आणि जसा दसरा मेळावा संपला तशीच या हॉटेलची तोडफोड झालीच समजा. आज बाळासाहेबांची साऊली मानले जाणारे “राज ठाकरे” उत्तर भारतीयांवर जेवढा राग व्यक्त करतात तेवढाच काहीसा शिवसेनेचाही होता आणि त्यापेक्षा ही जास्त राग सेनेने दक्षिणात्यांवर काढला आणि “लुंगी हटाओ, पुंगी बजाओ” असा नारा आपल्या सैनीकांना दिला. या दरम्यान बाळा साहेबांनी अनेक दिग्गज नेते महाराष्ट्र्ला दिले. मराठी माणसाला उद्योगाची आवड निर्माण व्हावी या साठी त्यांनी प्रोत्साहीत केले आणि एवढेच नव्हेतर साधा वडापाव विकणाऱ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री, आमदार, खासदार बनवले. 80 टक्के राजकारण व 20 टक्के समाजकारण असे त्यांचे सुत्रच बनले. त्यांनी असे करता करता अनेक रसत्यावरच्या कार्यकर्त्यांना दिल्ली पर्यंत पोहचवले आणि मराठीचा मानही राखला.
     शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात मराठी तरुणांना सेनेबद्दल वाढणारे आकर्षण, आपुलकी आणि विश्वास आज 46-47 वर्षे असाच टिकुन आहे. शिवसेनेच्या शिवाजीपार्क वरील पहीला मेळावा विजया दश्मीच्या दिवशी 30 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. त्यादिवसापासुन “एक नेता, एक मैदान” ही सेनेची भुमीका राजकीय इतिहासात “न भुतो न भविष्यते” असे अनेक पराक्रम करुन गेली. हे सत्य प्रत्येकाला मान्य कराव लागेलचं.
     बाळासाहेबांच्या कारकिर्दीचा काळ घ्याना. जेव्हापासुन शिवसेना स्थापन झाली तेव्हापासुन सलग 47 वर्षे बाळासाहेबांचा दरारा राहीला मग तो फेक्त राजकारणातच नव्हे तर एक व्यंगचित्रकार म्हाणुनही त्यांनी आपल्या कौशल्याचा डंका देशभर वाजवला आणि समस्त व्यंगचित्रकारांचे आदर्श ठरले. आपल्या संपुर्ण आयुष्यात त्यांनी कधी खोट बोल्ल् नाही एवढेच नाही तर माय मराठीचा आदर करण्यास त्यांनी जगाला शिकवलं. महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की त्यांच नाव हे विसरुन चालणार नाही कारण त्यांच्या उल्लेखा शिवाय महाराष्ट्राचा इतिहास हे अपुर्ण ठरेल इतपत त्यांचे योगदान हे श्रेष्ठ आहे. त्यांनी आपल आयुष्य हे सदैव कट्टर हिंदुवादी म्हणुन जगलं. त्यांनी कुठल्याही विषयात हात घातला की त्या विषयात त्यांनी कधीही माघार घेतची नाही. ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्या मग आपली सरकार असो वा नसो. सतत त्यांनी केंद्रसरकारला झुकण्यास भाग पाडले असे त्यांचे व्यक्तीमत्व.
     असा थोर नेता पुन्हा होणे नाही त्याच्या कारकिर्दीत त्यांचे असंख्य पराक्रम आपल्या समोर आले, दर वर्षी दसरा मेळावा व त्यात वाढती शिवसैनीकांची गर्दी दिवसेंदीवस वाढतचं होती. साहेबांचा आदेश हा प्रत्येक मराठी माणसाला काळ्या दगडावरची रेष असे. पाहता पाहता जगभरात त्यांचे नाव झाले. एवढेच नाही तर अमेरीका सारख्या बड्या देशातील नागरीक हिंदुस्तान म्हटल की “बाळासाहेब ठाकरे” म्हणुन ओळखु लागले.
      हळु हळु मात्र या हिंदु ह़दय सम्राट असलेल्या सुर्याचा अस्त झाला. सदैव आपल्या विजेसारख्या कडाडणाऱ्या नेत्याला, या दैवताला देश मुकला. कुणालाही न घाबरणारा हा वाघ आता धारातीर्थी पडला. यमापुढे मात्र या वाघाला सुद्धा नतमस्तक व्हाव लागल. त्या यमाने महाराष्ट्राचे काळीज छळणी केले. आजही ती दुपार आठवते ज्या दिवशी बाळासाहेबांच्या मृत्युची बातमी येताचं आजुबाजुला स्मशाण शांतता पसरली होती. मुंबईसारख्या गज-बजलेल्या शहरात अचानक कुणी जादु मंतरली होती, अख्खा महारष्ट्र जणु पोरका झाला होता. रिक्षा, बस, बाईक एवढच नाही तर साधी सायकल सुद्दा रसत्यावर दिसत नव्हती. जणु पुर्ण देशाला सुतक लागले होते. माझा शिवसेना किंवा इतर कुठल्याही पक्षाशी संबंध नाही पण अचानक माझे उर भरुन आले होते. लोकल मध्ये बसल्यावर लोकांच्या गप्पा कानी पडल्या, बाळासाहेबांचे मराठी भाषा आणि मराठी माणसा साठी केलेले योगदान हे शब्दात सागण्या इतपत लहान तर नाही पण मला सार काही अर्ध्या तासाच्या प्रवासात मला कळल आणि अश्रृंचा बांध अनावर झाला व आपो-आप डोळ्यांमधुन अश्रृंच्याधारा वाहु लागल्या. काहीतरी महत्वाच हरवल्याचा मला भास होत होता. घरी पोचताच प्रत्येक चॅनेलवर बाळासाहेबांच्या अंत्य यात्रेचेच दृश्य दाखवत होते. जणु संपुर्ण देशावर सुतक पडले होते. बाळासाहेब नावाच वादळ आता थांबल होतं, मायेची थाप देणारा हात आता शिवसैनीकाच्या डोक्यावरुन उठला होता. भारतातील राजकारणाच्या इतिहासात असा नेता ना कधी पाहीला ना कधी ऐकला होता. ज्याच्या अंत्या यात्रेत कोट्यावधी लोकांची गर्दी लोटली होती अक्षरश: झाडांच्या फांद्यांवर लोक चढुन बसली होती. ते फक्त बाळासाहेबांच अंतीम दर्शन घेण्यासाठी, त्यांना अखेरचा “जय महाराष्ट्र” करण्यासाठी......

जय महाराष्ट्र!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा