शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५

मोगली अत्याचाराच्या खुणा नष्ट करून तेथे स्वाभिमान व शौर्याची शिल्पे उभारणे हा गुन्हा ठरतो काय?



मोगली अत्याचाराच्या खुणा नष्ट करून तेथे स्वाभिमान व शौर्याची शिल्पे उभारणे हा गुन्हा ठरतो काय?

संभाजीनगर!
मराठवाड्याच्या संतभूमीत पापी औरंग्यास बुडविण्याचे कार्य शिवसेनेने कधीच केले आहे. हे शहर औरंगजेबाच्या नावाने नव्हे, तर छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या नावानेच ओळखले जाईल. 'औरंगाबाद नव्हे, संभाजीनगर! संभाजीनगर!' अशी डरकाळी आम्ही ८ मे १९८८ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील अति अतिविराट सभेत फोडली होती व त्या सभेत जणू चैतन्याचा लोळच उठला होता. त्या दिवशीच औरंग्याचे उरलेसुरले अस्तित्व संपून औरंगाबादचे संभाजीनगर झाले होते. त्यावर काल महापालिकेत पुन्हा एकदा ठरावाचे शिक्कामोर्तब झाले इतकेच. अत्याचारी मोगल बादशहा औरंगजेबाच्या नावाने ही शूर भूमी कशी ओळखली जाईल? छे, छे, शक्य नाही. अजित पवारांनी व शरद पवारांनी दोनच दिवसांपूर्वी समस्त महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शन करताना सांगितले, 'लोकशाहीत बहुमताला किंमत आहे. पुणे महापालिकेतील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याचा निर्णय बहुमताचा असल्याने तो मानायलाच हवा!' हा दिव्य संदेश पवार काका-पुतण्यांनी महाराष्ट्रातील समस्त अडाण्यांना दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. बहुमताचा निर्णय झाला म्हणून पहाटे दोन वाजता दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणार्‍यांनी संभाजीनगर महानगरपालिकेचा निर्णयही बहुमताचाच आहे व राज्य सरकारने हा बहुमताचा निर्णय तत्काळ अमलात आणून तुमच्याच त्या दळभद्री लोकशाहीची बूज राखावी म्हणजे झाले. संभाजीनगर महापालिकेने दोन ठराव केले. पहिला ठराव औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत तर दुसरा ठराव संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव धर्मवीर संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याबाबत. या दोन्ही नावांना कोणी विरोध करण्याचे कारण नाही. जे विरोध करतील ते महाराष्ट्र अस्मितेचे दुश्मन व महाराष्ट्रद्रोही म्हटले पाहिजेत. कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेतील संभाजीराजांच्या ठरावास विरोध केला त्याचे दु:ख वाटून घेण्याचे कारण नाही. बेइमानांची अवलाद
औरंग्याच्या खाल्ल्या मिठास
जागली. थडग्यात गाडलेल्या औरंग्याच्या धमन्यांतील रक्तच कॉंग्रेसवाल्यांच्या नसानसांत उसळ्या मारीत असल्याने त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी? ज्यांचे सारे आयुष्य धर्मांध मुसलमानांच्या राजकीय लाचारीत गेले व जात आहे त्यांच्या तोंडून फक्त महाराष्ट्रद्रोहाची 'बांग'च निघणार हो! म्हणूनच सारे संभाजीनगर शहर काल राजे संभाजींच्या नावाने जयजयकार करीत असताना कॉंग्रेसची औरंगी अवलाद दु:खाने हुंदका देत बसली होती. हीच ती अवलाद जिने छत्रपती शिवराय व संभाजीराजांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही छळले. मुळात या कॉंग्रेजी मंडळींना 'धर्मवीर' संभाजी राजापेक्षा कपटी औरंगजेबाच्या दाढीचा एवढा पुळका कशासाठी? हेच आम्हाला समजत नाही. संभाजी राजांचे महान धैर्य आणि शौर्य काय कॉंग्रेजी बाटग्यांना ठाऊक नाही? नसेल तर इतिहास वाचा. कोकणातील संगमेश्‍वर येथे औरंगजेबाने संभाजी राजांना कारस्थान रचून पकडले. साखळदंडाने जखडून फरफटत त्यांची धिंड काढली. औरंगजेबाने संभाजी राजांसमोर दोनच पर्याय ठेवले होते. एक तर 'इस्लाम' कबूल करून मुसलमान होणे किंवा प्रचंड यातनांसह मृत्यू...! संभाजी राजांनी दुसरा पर्याय निवडला. शिवरायांचा छावाच तो. 'प्राण गेले तरी बेहत्तर, पण धर्म सोडणार नाही', असे संभाजी राजांनी मुघल बादशहाला निक्षून सांगितले. हे बाणेदार उत्तर ऐकून औरंगजेब पिसाळला. चाबकांचे असंख्य फटके मारून संभाजी राजांचे अंग सोलून काढण्याचे फर्मान त्याने सोडले. संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झाले असतानाही त्यावर मीठ चोळण्यात आले. तब्बल चाळीस दिवस असाच अतोनात छळ सुरू होता पण संभाजी राजे बधले नाहीत. अखेर तप्त लोखंडी सळ्या डोळ्यात खुपसून संभाजी राजांचे डोळे काढण्यात आले. नंतर जीभ छाटण्यात आली. तरीही संभाजी राजांनी हिंदू धर्म सोडायला नकारच दिला. तेव्हा तलवारीचे घाव घालून त्यांचे शीर धडावेगळे करण्यात आले. पापी औरंग्या एवढ्यावरच थांबला नाही. त्याने संभाजी राजांच्या मृतदेहाचीही विटंबना केली. हिंदू धर्मात दफन विधी मान्य नसताना औरंगजेबाने मुद्दाम संभाजी राजांना दफन केले. त्याच क्रूरकर्मा औरंगजेबाने आपले नाव या शहराला दिले.
'औरंगाबाद' नावाचा हा कलंक
का म्हणून सहन करायचा? हा कलंक पुसून टाकण्याचे ऐतिहासिक काम शिवसेनेने केले आहे. यापूर्वीही १९ जून १९९५ रोजी याच महापालिकेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा ठराव मंजूर केला तेव्हा शिवसेनेची सत्ता होती. हाच ठराव बहुमताने मंजूर करून अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठवला. युती सरकारच्या काळात ९ नोव्हेंबर १९९५ रोजी या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सत्तेत आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारने बहुमताचा हा ठराव रद्द करून केराच्या टोपलीत फेकला. 'बहुमताच्या ठरावाचा आदर करा' असे कोंडदेवप्रकरणी सांगणारेच तेव्हा मंत्रालयात होते. मोगली अत्याचाराच्या खुणा नष्ट करून तेथे स्वाभिमान व शौर्याची शिल्पे उभारणे हा गुन्हा ठरतो काय? या देशात, महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते अस्वस्थ करणारे आहे. मुसलमानी मतांच्या लाचारीने बेगडी निधर्मीवाद्यांच्या डोळ्यांत झिंग उतरली आहे. त्यांना शिवाजी व संभाजी हे लुटारू वाटतात तर हिंदू दहशतवादी ठरविले जातात. हा महाराष्ट्र शिवरायांचा नसून औरंगजेब आणि अफझलखानाचाच आहे. औरंग्या व अफझलखानाची 'कॉंग्रेजी' अवलाद जे सांगेल तेच सत्तेच्या बळावर अमलात आणण्याचे दळभद्री प्रकार उद्या देशाचे प्रचंड नुकसान केल्याशिवाय राहणार नाहीत. अयोध्येत प्रभू श्रीरामाला आजही त्या बाबराशी संघर्ष करावा लागतो. कारण बाबराच्या पाठीशी कॉंग्रेससारख्या भंपक धर्मनिरपेक्षवाद्यांचे बळ आहे. मराठवाड्यात आजही निजामाची अवलाद वळवळते आहे व संभाजीनगरात गाडलेला औरंगजेब अधूनमधून थडग्यातूनच 'इस्लाम खतरे में'ची बांग देत मुसलमानांची डोकी भडकावीत असतो. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनीच गाडलेला अफझलखान म्हणजे मुसलमानांचा नवा प्रेषितच ठरला आहे. मुसलमानी भावनांची 'ठेच' इतकी जबरदस्त असते की, अनेकदा मुसलमानांच्या भावना एखाद्याप्रकरणी झोपलेल्या असल्या तरी त्या झोपलेल्या भावनांसाठी कॉंग्रेसवाले व त्यांचे निधर्मी बगलबच्चे उगाचच ठेचाळत असतात. या ठेचांनी हिंदू शहाणा होईल, जागा होईल, पेटून उठेल या भावनेने आम्ही मात्र रान उठवीत आहोत, पण शिवरायांचे नाव घेणारा समस्त मर्द मर्‍हाटा हिंदू म्हणून एकवटत नाही. कॉंग्रेस पक्षातला बाटगा हिंदू संभाजीराजांना दूर लोटून औरंगजेबास मुजरे झाडतो व संभाजीराजांचे नाव का दिले म्हणून बांग देतो याचे दु:ख वाटते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे! आम्ही मात्र हिंदूंना जागविण्याचे आमचे कार्य सुरूच ठेवणार. औरंगाबादचे संभाजीनगर केले आहे. चिकलठाणा विमानतळासही संभाजीराजांचे नाव दिले आहे. कुणा बाटग्याची हिंमत असेल तर यावे अंगावर!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा