शनिवार, २४ जानेवारी, २०१५
मथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब !
हे बाळासाहेब होते. लोकभावना समजून घेणारे आणि मागचा पुढचा विचार न करता देधडक-बेधडक वागणारे! शिवसैनिकांना थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांमध्येच होती. म्हणूनच तर बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर १९६९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारवर नामुष्की आली आणि त्यांनाच बाळासाहेबांना विनंती करावी लागली की, त्यांनी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करावे.. कारण मुंबई पेटण्यास सुरुवात झाली होती आणि शिवसैनिकांना रोखण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. पोलिसी बळाचा वापर करून प्रश्न चिघळला असता याची जाणीव काँग्रेसी राज्यकर्त्यांना होती.
एवढेच नव्हे तर अगदी बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांची ताकद दिसली ती लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये. आणि लोकमान्य टिळकांनंतर झालेला हा दुसरा सार्वजनिक अंत्यविधी. त्याला परवानगी देतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी असे कारण देऊन अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मृत्यूनंतरही ती ताकद कायम होती !
ही ताकद बाळासाहेबांकडे आली ती त्यांच्यातील गुणवैशिष्टय़ांमुळे. अमोघ वक्तृत्व, धारदार शैली, थेट काळजाला भिडणारे भाषण आणि नसानसांत भरलेला बेधडकपणा यामुळे. अगदी आधुनिक चष्म्यातून पाहायचे तर बाळासाहेब हे स्वत:च एक उत्तम ब्रॅण्ड होते. त्यांचे ते ब्रॅण्ड असणे त्यांच्या चालण्यावागण्या आणि बोलण्यातूनही जाणवायचे. त्यांनी स्वत:ला तसे सादर केले. एका उत्तम ब्रॅण्डमध्ये जी सर्व गुणवैशिष्टय़े असावी लागतात ती सर्व बाळासाहेबांमध्ये होती. त्यामुळेच केस विस्कटलेले, गचाळ अवस्थेतील बाळासाहेब कधीच पाहायला मिळाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली छायाचित्रे पाहिली तर हे अगदी सहज लक्षात येईल.
सुरुवातीच्या काळात जोधपुरी कोट हा त्यांचा पेहराव होता. त्यानंतर सदरा, पायजमा, अंगावर शाल समोरून गळ्यात दिसणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा आणि हाताच्या बोटांमध्येही ती रुद्राक्षाची माळ अडकलेली ! बाळासाहेब हे सर्वोत्तम ब्रॅण्ड असल्याचीच ही सारी लक्षणे होती.
‘ठाकरी शैली’ आणि ‘ठाकरी बाणा’ हे तर केवळ त्यांच्या वक्तृत्व आणि भाषेसाठी खास वापरण्यात आलेले शब्दप्रयोग यामध्येही त्यांचे नाव आहेच. ही ठाकरी शैलीच सामान्यांना सर्वाधिक भावली. त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी होती ती उत्स्फूर्तता आणि बेधडकपणा. जाऊन थेट धडकायचे नंतर काय होणार याचा फारसा विचार त्या मागे नसायचा. खरे तर तारुण्यामध्ये प्रत्येक माणूस कमी-अधिक फरकाने हा गुण मिरवत असतो. बाळासाहेबांनी तो आयुष्यभर मिरवला, ते आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांची भाषणे ही प्रामुख्याने तरुण सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आवाहन करणारी असायची. त्यात आवाहन कमी आणि आव्हानच अधिक असायचे. ती भाषणे अंगार फुलवणारी आणि चेतवणारी होती. म्हणूनच त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे चिथावणीखोरीचे होते! सर्व गुन्ह्य़ांमध्ये चिथावणीखोरीचे कलम समान दिसेल. हाच त्यांचा बेधडकपणा, अंगावर घेण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवली ती ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर. त्याची जबाबदारी घेण्यासाठी रास्वसंघ किंवा मग भाजपा, विश्व हिंदूू परिषद कुणीच तयार नव्हते. त्यावेळेस ते शिवसैनिक होते, अशी आवई आली. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेबांचे विधान आले.. ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!
त्यांचा हा दरारा काही केवळ जनसामान्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर थेट न्यायालयांपर्यंत होता. बाळसाहेबांचे अभय अनेकांना मोठा मदतीचा हात देऊन गेले. बोफोर्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेला अमिताभ बच्चन असो किंवा मग बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली पकडला गेलेला संजय दत्त असो. संजय दत्तच्या सुटकेसाठी तर मग बाळासाहेबांनी थेट टाडा न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाच लक्ष्य केले. किणी प्रकरणात राज ठाकरे अडकले होते तेव्हाही त्यांनी थेट दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरच आरोप केले! एवढे सारे होऊनही बाळासाहेबांवर या दोन्ही प्रकरणांत कोणतीही कारवाई झाली नाही. हा दरारा की, सरकारची निष्क्रियता यावर वाद होऊ शकतो!
कोणताही ब्रॅण्ड वर्षांनुवर्षे तसाच राहिला तर तो कालगतीत नामशेष होण्याचा धोका असतो. बाळासाहेबांनी कालगतीनुसार बदलही केला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा स्वीकारही त्यांनी असाच केला. मग तो अखेपर्यंत कायम होता. त्यानंतर बदललेले बाळासाहेब नंतर केवळ भगव्या वेशातच दिसले. त्यांची शालही भगवी होती. अंत्यसंस्काराच्या वेळेसही त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रेच होती. फक्त पेहेराव नाही तर बाळासाहेबांच्या सवयीदेखील त्यांच्या ब्रॅण्डच होत्या. सुरुवातीस त्यांच्या तोंडातील चिरूट हा त्यांचा परिचय होता. कधी हातात सिगार असायचा. नंतर हाताच्या बोटांमध्ये रुद्राक्षांची माळ विसावली. त्यांचा मोठय़ा फ्रेमचा चष्मा हादेखील तसाच. यातील प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेबांचा परिचय होती.
पण या सर्वाना दशांगुळे उरणारी गोष्ट होती ती त्यांचे धारदार नेतृत्व. त्यांचे वागणे, बोलणे, भूमिका यांत अनेकदा विरोधाभास असायचा. त्यामागे त्यांचे स्वत:चे असे वेगळे तर्कशास्त्र होते. पण सामान्य माणसाचा मात्र गोंधळ व्हायचा. पाकिस्तानी संघाला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्याच घरात जाऊन जावेद मियांदाद मेजवानी कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न सामान्यांच्या मनात यायचा. पण हा विरोधाभास हेदेखील बाळासाहेबांचेच पेटंट असावे.
मनात येईल ते बोलायचे हे त्यांचे तत्त्व होते म्हणून त्यांना कदाचित रूढार्थाने राजकारणी म्हणताना थोडा विचार करावा लागतो. कारण राजकारणी व्यक्ती अनेकदा केवळ मतलबाचेच बोलतात. बाळासाहेब हे एक अजब रसायन होते. म्हणूनच ते या ब्रॅण्डच्याही पलीकडे जाऊन ‘ग्रॅण्ड’ ठरले. भव्यदिव्यता हे त्यांचे आकर्षण होते, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी, तर माणूस मोठा होतो!
त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा हा ब्रॅण्ड स्वत:सोबत वागवला. पण हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे! म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय? शिवसेनेचे काय होणार? खरे तर हा प्रश्न कदाचित बाळासाहेबांच्याही मनात होताच म्हणूनच तर त्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. बाळासाहेबांचा हा ब्रॅण्ड पुढे नेणे सोपे काम तर निश्चितच नाही आणि आताच्या परिस्थितीत तर ते अधिकच कठीण असणार आहे. त्यांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाला हाच विचार करावा लागेल की, बाळासाहेब ठाकरे नावाच्या ग्रॅण्ड अशा ब्रॅण्डचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्यात आहे काय?
vinayak.parab@expressindia.com
महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांची लाट – आदित्य ठाकरे
आदित्य
ठाकरे यांचा झंझावात… सांगलीत प्रचंड सभा, दक्षिण कराडमध्ये दणदणीत रोड शो
13th October 2014
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
सत्ता मिळविण्यासाठी स्वाभिमान सोडून महाराष्ट्र दिल्लीश्वरांसमोर कधीही झुकणार नाही. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आता शिवसेनेचे सरकार येणार असून मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार असल्यामुळे कराड येथे सभांचा समारोप केला, असे ते कराड विमानतळावर बोलताना म्हणाले.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला. आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तापरिवर्तनासाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. ज्या भाजपसाठी आपण लढलो, झगडलो त्या भाजपने आपला विश्वासघात केला. मला अभिमान आहे शिवसेना पक्षप्रमुखांचा. सत्तेसाठी ते भाजप किंवा मोदींसमोर झुकले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख झुकतात फक्त छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच. आता वेळ आली आहे दिल्लीश्वरांना आपली ताकद दाखवण्याची, असे आवाहन त्यांनी केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आजही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे, पण एका सत्तेमुळे कसली ही मस्ती? राज्यातील शिवसेना-भाजपची गेल्या २५ वर्षांची युती तोडली. शिवसेनाप्रमुखांनी ज्या विश्वासाने तुमच्याशी २५ वर्षे युती सांभाळली त्यांच्या पाठीत केलेला हा वार सर्वसामान्य जनता सहन करणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. यावेळी शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण सह्या करा… सह्या करा, कराडमध्ये घोषणाबाजी
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कराडमधील रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोड शोला दत्त चौकातून प्रारंभ झाला. संपूर्ण कराड शहरातून रोड शो झाला. यावेळी तरुणांनी ‘मुख्यमंत्री सह्या करा… सह्या करा’ची घोषणाबाजी करीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील रोष व्यक्त केला. यावेळी तरुणाईने ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेनेचे सुवर्णयुग येणार
विधानसभा निवडणुकीचे मतदान १५ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्र्रासमोरील समस्यांचा रावण शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मारून टाका आणि शिवसेनेच्या सुवर्णयुगाला सुरुवात करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार आहे. क्रांतिकारी निर्णयातून महाराष्ट्रात सुवर्णयुग अवतरणार आहे. युवकांनी पुढाकार घेऊन विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच
कराड : कॉंग्रेस पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात मी शेवटचा आलो आहे, कारण यापुढे येणारे सरकार हे शिवसेनेचे असून मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वाढता पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे. सर्व महाराष्ट्रात भगवे वातावरण दिसते आहे. त्यामुळ या वेळेस शिवसेना सत्तेवर येईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे याची मला खात्री आहे. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे स्वबळाचे सरकार येणार आहे. यापुढच्या सरकारचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरुवार, २२ जानेवारी, २०१५
मंगळवार, २० जानेवारी, २०१५
अखेरचा "जय महाराष्ट्र'
वरकरणी सामाजिक व अस्मितारक्षक वाटणारी शिवसेना हळूहळू राजकीय शक्तीत रूपांतरित होत होती. पुढे पुढे तर "ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' हे सूत्र उलटे झाल्यानंतरही लोकांनी ते आनंदाने स्वीकारले. शिवसेनेला सत्तेवर बसविले. 1966 ला शिवसेना जन्माला आली आणि अनेक वर्षे आग, विस्तव, वादळ, डोंगर यांच्याबरोबर सातत्याने लढत लढत 1995 मध्ये भगवा घेऊन ती सत्तेच्या सिंहासनावर गेली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांबरोबर तिने टक्कर दिली. मुंबईच्या महापौरापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि लोकसभेच्या सभापतिपदापर्यंत एका प्रादेशिक पक्षाने मोठ्या आत्मविश्वासाने मारलेली ही धडक होती. या काळात बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला, साहित्यिकांना बैल म्हटले, आणि होय, आम्हीच बाबरी मशीद पाडली, असे ठणकावून सांगितले. हिंदुत्ववादाच्या बाबतीत भाजप मिळमिळीत आणि शिवसेना आक्रमक आहे, असे सांगत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याची स्वप्ने पेरली आणि ती उगवली तीही त्यांच्या हयातीतच. बाळासाहेबांच्या अंगा-खांद्यावर वाढलेले आणि मोठे झालेले त्यांचे काही सरदार शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याबाहेर पडले. शिवसेनेला जातिवादी ठरविणारे काही जण शिवसेनेच्या किल्ल्यात येऊन किंवा शिवसेनेच्या मदतीने सत्तेची ऊब भोगू लागले. याच काळात मुंबईत मायकल जॅक्सनचा प्रयोग घेऊन बाळासाहेबांनी संस्कृतिरक्षकांना जबरदस्त धक्का दिला होता. याच काळात शिवसेनेला अनेक पराभवही पचवावे लागले होते आणि शिवसेनाप्रमुखपदही सोडेन, अशी घोषणाही बाळासाहेबांनी याच काळात केली होती. सर्वांत धक्कादायक घटना म्हणजे याच काळात राज ठाकरेही शिवसेनेबाहेर पडले. आणखी काय काय झाले, हे सांगता येऊ नये इतके घडत गेले. लोकांनी मात्र आपला महानायक म्हणून बाळासाहेबांवरील आपली अभंग निष्ठा कायम ठेवली होती. त्यांची प्रकट झालेली विविध रूपे मान्य केली होती. मला प्रबोधनकारांची श्रेष्ठ परंपरा आहे, असेही बाळासाहेब सांगायचे आणि त्याच वेळेला "गर्व से कहो हम हिंदू है' हेही सांगत एका विशिष्ट समूहावर तुटूनही पडायचे. लोकांनी बाळासाहेबांच्या या भूमिकांविषयी कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हेच बळ होते. साहित्यिकांना बैल म्हणणारे बाळासाहेब पुढे कुसुमाग्रजांच्या पायावर माथा टेकवतात, हेही लोकांनी पाहिले होते. देश सोनिया गांधींच्या इटलीत गहाण पडलाय, असे म्हणणारे बाळासाहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देतात, हेही पाहिले होते. एक मनस्वी आणि स्वतःला वाटेल तेच करणारा आणि त्याची बरी-वाईट किंमत मोजणारा, कधी वादळाच्या हातात हात देऊन तर कधी वादळावर स्वार होऊन जगणारा आणि स्वतःच्या हिमतीवर राजकारण वळवणारा हा नेता होता.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना जन्माला आल्या. काही काळ त्या चमकल्या आणि निस्तेजही झाल्या; पण शिवसेनेचे मात्र तसे झाले नाही. यामागची नेमकी कारणे शोधण्याचा नीट प्रयत्न झाला पाहिजे. बाळासाहेब नुसतेच व्यंगचित्रकार नव्हते, तर ते धूर्त, मुरब्बी राजकारणीही होते. त्यांना राजकारणाचे वारे नीट कळायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा विविध समाजघटकांचे विविध पक्षांत विभाजन झाले होते. दलित, अल्पसंख्याक कॉंग्रेसकडे, उच्चवर्गीय भाजपकडे, श्रमिक डाव्यांकडे, अशी ढोबळमानाने ती विभागणी होती. बाळासाहेबांनी या सर्वांचा खोलवर अभ्यास केलेला होता. जे समूह वा घटक सत्तेच्या विभागणीबाहेर फेकले गेले होते त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेत खेचले. मराठेतर ओबीसी, बौद्धेतर दलित, अल्पशिक्षित, बेरोजगार तरुण असे हे घटक होते. यांपैकी बहुतेकांना स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या कारणाने सत्ता मिळाली नव्हती. ती मिळण्याची शक्यताही नव्हती. हा सारा वर्ग शिवसेनेने आपल्याकडे वळवला. त्याला थेट सत्तास्थानावर नेऊन बसविले. बाळासाहेबांनी घडवलेला हा राजकीय चमत्कार होता. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. शिवसेनेत जात-पात मानली जात नाही, हे बाळासाहेबांनी कृतीतूनच सिद्ध केले. मातंग, चर्मकार, साळी, माळी, कोष्टी, कोळी, तेली, तांबोळी आदी अनेक उपेक्षितांमधील लोक विधानसभेत आणि लोकसभेत शपथ घेताना दिसले. सत्ता तळागाळापर्यंत नेण्याचा दावा कॉंग्रेस करत होती आणि बाळासाहेब प्रत्यक्षात ते घडवत होते. हेही खरे आहे, की बाळासाहेबांची अनेक कल्याणकारी स्वप्ने "ओव्हरसाइज' होती; पण लोकांनी त्याकडे कानाडोळा केला. गरिबांसाठी गावोगाव झुणका-भाकर केंद्रे, चाळीस लाख झोपडवासीयांना मुंबईतच मोफत घरे, सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, प्रत्येकाला नोकरी अशी किती तरी आश्वासने म्हणजे वचननामे शिवसेनेने आभाळभर पसरवली होती. प्रत्यक्षात या वचननाम्यांचे काय झाले हे सर्वश्रुत आहे. अर्थात, सत्तेच्या राजकारणात बाळासाहेबांनीच अशी वचने दिली असे नाही. पुढे इतरांनाही या वचननाम्यांची भुरळ पडली हा भाग वेगळा. राजकारणातच शिवसेना तयार झाली असे नाही, तर अल्पावधीतच कामगार सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना, टपरीधारक सेना, दलित सेना, कलावंत सेना, महिला सेना, वाहनधारक सेना अशा असंख्य रूपांत ती प्रकट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात अद्भुत कादंबरी वाटावी असे एक वैशिष्ट्यपूर्ण पर्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मराठी माणसाच्या हितापोटी जन्माला आलेली शिवसेना पुढे पुढे व्यापक रूप घेऊ लागली. गरिबांचे तारणहार आम्हीच आहोत, असे सांगू लागली. दुसऱ्या बाजूला बदलत असतात तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि तीच शिवसेना, असे समीकरण रूढ होऊ लागले. मराठी माणसाच्या उद्धाराचा निर्धार कायम ठेवत शिवसेनेने हे बदल घडविले होते. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे हे बदल आहेत. आयुष्यभर लढत राहिलेला हा महानेता मृत्यूशीही लढत राहिला. बऱ्याच वेळेला विजय मिळवत राहिला; पण शेवटी माणूस हरतो आणि मृत्यूच विजयी होतो, हे निसर्गाचे सूत्र त्यांनाही स्वीकारावे लागले. मराठी माणसाच्या अस्मितेला जेव्हा केव्हा यापुढेही अंकुर फुटतील, अंकुराचे टोकदार भाले व्हायला लागतील, तेव्हा याद येत राहील ती बाळासाहेबांचीच. या महापराक्रमी नेत्याला अखेरचा जय महाराष्ट्र.
बाळासाहेब आणि शिवसेना राजकारणात एक चमत्कार वाटत असला, तरी या चमत्काराच्या मागेही काळ आणि माणूस वेळीच समजून घेण्याचा प्रयत्नही होता.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...