शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५
बाळासाहेब : बाबा आणि आईही!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की तेजाचा गोळा... दरारा...
करारी बाणा. मात्र याच्या उलट चित्र 'मातोश्री'मध्ये आम्ही अनुभवतो. कुटुंबवत्सल, प्रेमळ
पिता, घरातल्या प्रत्येक सदस्याशी हितगुज साधणारा कुटुंबप्रमुख... असे एकापेक्षा एक
अस्सल गुण आम्हाला 'मातोश्री'तल्या शिवसेनाप्रमुखांमध्ये पहायला मिळतात. आम्हा तिघा
भावंडांना त्यांनी कधीही मारलं नाही. साधा हातही कधी उगारला नाही. त्यांना काय आवडते,
त्यांना कशाचा राग येतो हे त्यांच्या वागण्यातूनच आम्ही ओळखायचो. मराठी माणसाला न्याय
मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आयुष्यात सतत संघर्षालाच
तोंड द्यावे लागले. तरीही, त्यांनी स्वभावात त्रागा येऊ दिला नाही. मात्र एखाद्या माणसावर
अन्याय झाला की याच प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे रुपांतर रागात होते आणि त्याचे पडसाद त्यांच्या
रागापेक्षा दसपटीने अधिक उमटतात. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात
कुठून येते, हे आम्हालाही आजवर न उलगडलेलं कोडं आहे...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा