मुंबई, शुक्रवार, 2
एप्रिल 2010 (14:45 IST)
'सानियाचे
हृदय भारतीय नाही़ नाहीतर तर ते पाकड्यांसाठी धडधडले नसते. लग्नासाठी पाकिस्तान आणि
पैसा, प्रसिद्धी, मानमरातबसाठी भारत हे चालणार नाही. सानिया मिर्झा यापुढे भारतीय राहणार
नाही,' अशा कठोर शब्दांत शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया 'सामना'च्या
अग्रलेखात व्यक्त केली आहे. भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी
क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी निकाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया बाळासाहेबांनी
व्यक्त केली.
लग्नानंतर सानिया भारतासाठी खेळणार याबाबत ठाकरे यांनी अग्रलेखात म्हणाले, की लग्न होऊन सासरी गेल्यावर ती भारतासाठी कशी खेळू शकेल. सानिया पाकिस्तानात गेल्यावर त्या देशाची नागरीक होईल. म्हणजे नागरिकत्व पाकिस्तानचे आणि खेळायचे मात्र भारताकडून. सानियाला हा देश म्हणजे टेनिसमधला बॉल वाटला का? हवा तेव्हा, हवा तसा आपल्या रॅकेटने टोलविला. बये, तू आता जातच आहेस ना त्या शोएबशी निकाह करुन पाकिस्तानात, मग त्याच देशाकडून वाट्टेल तेवढे खेळ ना. भारतासाठी टेनिस खेळायची तुझी इच्छा होती तर पाकड्याऐवजी एखादा भारतीयाची जीवनसाथी म्हणून निवड केली असती.
सानियाच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने तातडीने पाकिस्तानकडून व्हिसा देण्यात आला, त्याबद्दल बाळासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केले. जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनाही व्हिसा देताना पाकिस्तानने बरीच खळखळ केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. अभिनेत्री रिना रॉय, भाईदरची आशा पाटील यांचे लग्नानंतर पाकिस्तानात झालेला छळचा आठवण बाळासाहेबांनी करुन दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा