चिनूक्स | 21 October, 2013 - 12:46
'एक नेता, एक मैदान' ही शिवसैनिकांची अनेक दशकांपासून श्रद्धा.
बाळासाहेब ठाकरे गेले, आणि या श्रद्धेला तडा गेला. महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणंही
त्यांच्या निधनामुळे बदलली. शिवसेना हा पक्ष आता लवकरच वयाची पन्नाशी गाठेल. 'मराठी अस्मिता' जपण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष. आजवरच्या वाटचालीत या पक्षाला अनेक बिरुदं चिकटली. 'हिंदू राष्ट्रवादी', 'फॅसिस्ट' अशी नामाभिधानं मिळवणार्या या पक्षानं मात्र मुंबईवर अनेक वर्षं राज्य केलं आणि महाराष्ट्रातही सत्ता उपभोगली. केंद्र सरकारातली महत्त्वाची पदं मिळवली. पक्षात फूट पडली. आणि तरीही 'मराठी अस्मिता' हा फक्त आपल्या अखत्यारितला विषय आहे, अशा आत्मविश्वासानं हा पक्ष वावरत राहिला.
श्री. प्रकाश अकोलकर यांच्या पत्रकारितेतला आवाका आणि अनुभव मोठा आहे. 'शिवसेना' या विषयाबद्दल त्यांचा अभ्यास आणि त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. यातूनच तयार झालं 'जय महाराष्ट्र! - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक. शिवसेनेचा इतिहास, शिवसेनेचं राजकारण यांबद्दल इतकं सखोल लिखाण अन्यत्र झालेलं नाही. मनोविकास प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
या पुस्तकातलं श्री. प्रकाश अकोलकर यांचं मनोगत...
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे - http://kharedi.maayboli.com/shop/Jay-Maharashtra-Ha-Shivasena-Navacha-It...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा