मंगळवार, २० जानेवारी, २०१५

मी ह्रदयाने तुमच्या जवळच आहे - बाळासाहेब

शनिवार, 22 जानेवारी 2011 (17:11 IST)


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 23 जानेवारी 2011 रोजी 84 वर्षे पूर्ण करून 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब कुणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. बाळासाहेबांनी 'सामना'तून दिलेल्या संदेशात मी ह्रदयाने तुमच्या जवळच आहे, असे त्यांच्या लाडक्या शिवसैनिकांना म्हटले आहे.
बाळासाहेबांनी या संदेशात गर्दी भरल्या सभांची आठवण काढली असून आता आजारातून उठल्यानंतर ती ताकद राहिली नाही अशी खंत व्यक्त केली आहे. पण वयाने थकलो असलो तरी विचारांनी नाही, असेही स्पष्ट केले आहे.
'मातोश्री’ हे शिवसैनिक व हितचिंतकांचे माहेरच आहे. येथे येणार्‍या कुणालाच बंदी असू शकत नाही. पण सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला भेटता येणार नाही हेही तितकेच खरे. आपण मला समजून घ्याल असे आवाहनही बाळासाहेबांनी केलं आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा