मंगळवार, २० जानेवारी, २०१५

देशप्रेम गुन्हा असल्यास तो करूचः शिवसेनाप्रमुख



मुंबई, शनिवार, 13 फेब्रुवारी 2010 (11:49 IST)
शिवसेनेचा 'माय नेम इज खान'ला शिवसेनेचा विरोध नव्‍हताच तर अभिनेता शाहरूख खानने जे पाक प्रेम दाखवले आणि भारताचा अपमान केला त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. शाहरूखने शिवसेनेची माफी मागावी असाही आमचा आग्रह नव्हता तर देशाची माफी मागावी, अशी आमची भूमिका होती. देश मोठा आहे, आम्ही खान यांच्या विरोधात उभे राहिलो ते देशप्रेमामुळे आणि देशप्रेम हा भारतात गुन्हा ठरत असेल तर तो गुन्हा शिवसैनिक पुन्‍हा-पुन्‍हा करतील, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.

सामनातून प्रकाशित झालेल्‍या पत्रकात शिवसेना प्रमुखांनी म्हटले आहे, की मतांच्या लाचारीमुळेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एके-४७ च्या बंदोबस्ताखाली चित्रपटाला हजेरी लावली. चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि तुरुंगातही डांबले. मुख्‍यमंत्री जनतेच्‍या रक्षणासाठी आणि त्यांच्‍या अडचणी सोडवण्‍यासाठी आहेत की खानचे बॉडीगार्ड म्हणून काम करण्‍यासाठी असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसैनिकांनी ज्या पध्‍दतीने आंदोलन केले त्याबद्दल शिवसैनिकांचे आभार मानून शिवसेना प्रमुखांनी त्यांना शाबासकीही दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा