शिवसेना प्रमुखांना प्रथम वंदन
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या आठवणी,किस्से व फोटो.
शुक्रवार, ९ जानेवारी, २०१५
साहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.
हा लेख 'मातृभूमी' या मासिकात प्रकाशित झालेला आहे, संपूर्ण मासिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा!
'बाळासाहेब
ठाकरे' हे महाराष्ट्राचे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व आहे. एक आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे व्यंगचित्रकार ते हिंदूत्ववादी नेते असा साहेबांचा प्रवास आहे.
महाराष्ट्रातील
सर्वसामान्यांचे तसेच तरूणांचे आदर्श आहेत साहेब. ज्यांनी राजकारणात चालून
आलेली पदे सर्वसामान्यांना दिली, त्यांना मोठे केले पण स्वतः मात्र
सत्तेच्या राजकारणापासून चार हात दूर राहिले. साहेब आज देशातील लाखो
हिंदूंचे आधारस्थान आहेत. महाराष्ट्रातील खास करून मुंबईत जो काही मराठी
माणूस आज ताठ मानेने उभा आहे त्याचे संपूर्ण श्रेय साहेबांनाच जाते.
साहेबांनी आजपर्यंत सर्वात जास्त प्रेम शिवसैनिकांवर केले आणि साहेबांचा
शिवसैनिक असण्याचा मला खुप खुप अभिमान आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीत महाराष्ट्राचे मोठ- मोठे नेते आपले कार्यरत असताना बाळासाहेब
कुंचल्याच्या फटकार्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर आसूड ओढत असत. जवाहरलाल
नेहरू, मोरारजी देसाई, सदोबा पाटलांसारखे महाराष्ट्रद्रोह्यांनाही
साहेबांनी सोडले नाही. पुढे १९६० च्या दशकात मुंबईत मराठी माणसांवर
होणार्या अन्यायाने साहेब खुपच अस्वस्थ झाले. त्यांनी मार्मिक साप्ताहिक
सुरू केले. 'वाचा आणि थंड बसा' या लेखमालिकेतून मराठी माणसावरील
अत्याचारांना वाचा फोडली. शिवसेनेच्या माध्यमातून अन्यायाची जाण मराठी
तरूणांना करून दिली, त्यांची मने पेटविली आणि मराठी तरूण जागा झाला. त्याला
आपल्या हक्कांची जाणिव झाली आणि अन्यायाविरोधात लढू लागला.
साहेबांनी
सुरू केलेल्या लढ्याला मराठी माणसाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्राच्या गावोगावी शिवसेनेच्या शाखा सुरू होऊ लागल्या, साहेबांच्या
विचारांची देवाणघेवाण शिवसेना शाखांमधून होऊ लागली, सर्वसामान्यांची
गार्हाणी-समस्या ऐकून घेऊन सोडवली जाऊ लागली. काही वर्षातच शिवसेनेने
महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. साहेबांनी केलेल्या प्रत्येक
आवाहनाला मराठी माणूस खंबीर उभा राहू लागला. परंतु साहेबांच्या लढ्याला
काही मराठी माणसे व वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पत्रकार, विचारवंत विरोध करत
असत. त्यावेळी साहेबांच्या बाजूने वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांची स्वतःची
हिंमत, मराठी जनतेबद्दलचा जाज्वल्य अभिमान व समर्थ कुंचला हिच शक्तिस्थाने
होती.
हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाची चळवळ फार पूर्वीपासून सुरू
होती. तरीसुद्धा हिंदुत्वाची चळवळ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम
बाळासाहेबांनीच केले आहे. १९९२-९३ ची मुंबईतील दंगल असो किंवा मालेगाव
मध्ये सतत गणपती विसर्जनावर होणारी धर्मांध मुस्लिमांची दगडफेक असो.
महाराष्ट्रात आणि देशात प्रत्येक ठिकाणी हिंदू मार खात होता तेव्हा
प्रत्येक वेळी साहेबांनीच हिंदूंना धीर दिला. धर्मांधांविरूद्ध लढण्याची
ताकद आणि बळ दिले. आणि त्यांची पाठसुद्धा थोपटली.
१९९२ साली बाबरी
मशीद पाडली तेव्हा काहींनी हात झटकून हे काम शिवसैनिकांनी केले असे सांगू
लागले तेव्हा साहेब म्हणाले "हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर
त्याचा मला सार्थ अभिमान आहे." साहेबांनी आयुष्यात कधीही आपले शब्द मागे
घेतलेले नाहीत. जी भूमिका मांडली ती रोखठोक!
१९९३ च्या मुंबईतील
जातिय दंगलीमध्ये जागोजागी हिंदूंची कत्तल करण्याचे काम धर्मांधांनी सुरू
केले, जोगेश्वरीच्या बने कुटुंबातील लोकांना जाळले गेले, हिंदू
आया-बहिणींच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत या लोकांची मजल गेली तेव्हा
साहेबांनी चिडून उठून शिवसैनिकांना याच्या विरोधात जशाच तसे उत्तर देण्याचे
आवाहन केले. शिवसैनिकांनीही साहेबांचे आवाहन शिरसावंद्य मानून रस्त्यावर
आपल्या हिंदू माता-भगिणींची इज्जत वाचवण्याचे काम केले. मस्तावलेल्या
धर्मांधांची मस्ती जिरवली. हे केवळ साहेबांमुळेच घडले. मुंबईतील हिंदू
समाजाला तेव्हाच साहेबांची ताकद कळून आली आणि तेव्हापासून देशभरातील
हिंदूंना साहेबांचा आधार वाटू लागला.
गोध्रामधील धर्मांधांच्या
मस्तीला जशास तसे उत्तर देणार्या गुजरातचे मुख्यमंत्री माननिय नरेंद्रजी
मोदी यांच्यावर देशातील मिडीया तुटून पडली, भाजप मधूनही मोदींना एकाकी
पाडण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मित्रपक्ष म्हणून अडवाणींना साहेबांनी
मोदींना मुख्यमंत्री म्हणून पुढेही ठेवण्याचे सांगितले. आज आपण सगळे
पाहतोच आहोत कि आजचा गुजरात हा एक आदर्श राज्य म्हणून देशात नाव कमावत आहे.
हि सुद्धा एक प्रकारची साहेबांची जादू मानल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
गेल्या
वर्षी सर्वाधिक गाजलेल्या मालेगांव बॉम्बस्फोटात अडकविलेल्या हिंदू
प्रज्ञा साध्वीवर केवळ हिंदू म्हणून अतिशय घाणेरडे अत्याचार करण्यात आले.
कोणतेही आरोप सिद्ध न करता महाराष्ट्र एटीएस साध्वींना दहशतवादी ठरवण्याचा
प्रयत्न करीत असतानाच साहेब साध्वीच्या मागे खंबीर उभे राहिले आणि
काँग्रेसचे हस्तक बनून देशात हिंदू आतंकवाद वाढत आहे असे दाखविणार्या
एटीएस वाल्यांना साहेबांनी जबरदस्त पद्धतीने उत्तर दिले.
साहेबांचे
हिंदुत्व हे सर्वच मुसलमानांच्या विरोधातले नाही. जे जात्यंध मुसलमान आहेत,
ज्यांचा आजही पाकिस्तानला पाठिंबा असतो, जे देशद्रोही आहेत अशांना
कुठल्याही परिस्थितीत साहेब सोडत नाहीत. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारे
साहेब फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा बंद करून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील
अंधश्रद्धांना तशाच ठेवणार्या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती' वरही बरसतात.
आपल्या संस्कृतीत बरेच चांगले उत्सव असताना परकिय 'वेलेंटाईन डे' सारखे
दिवस साजरे करणार्या आजच्या तरूण पिढीला आपली संस्कृतीची योग्य माहिती
व्हावी आणि वेलेंटाईन डे सारखी थेर बंद व्हावीत असे साहेबांना ठामपणे
वाटते.
"हिंदुत्व" हेच राष्ट्रीयत्व मानणारे आमचे साहेब म्हणूनच लाखो हिंदूंचे "हिंदूहृदयसम्राट" आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच एक वाक्य कायम लक्षात ठेवा...��
उत्तर द्याहटवा��"ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेड म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवितात आणि हुशार लोकं तोच इतिहास वाचतात...!!!"
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा