मंगळवार, २० जानेवारी, २०१५

मी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे - शिवसेनाप्रमुख

मुंबई, शनिवार, 28 मे 2011 (13:21 IST)
मी आणि माझे कुटुंबीय अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहेत. डेव्हिड हेडली तर शिवसेना भवनाची पाहणीही करून गेला. भारताने पाकिस्तानवर थेट हल्ला करून अतिरेक्यांचे तळ कायमचे उद्ध्वस्त करावेत, अशी सनसनाटी मुलाखत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. बर्‍याच दिवसांनी बाळासाहेबांनी आपले मौन सोडले.
पाकिस्तानला आमचा काश्मीर कशाला हवाय, असा सवाल करीत ठाकरे यांनी भारताने थेट पाकिस्तानवर हल्ला करावा आणि एकदाच्या सार्‍या समस्या संपवून टाकाव्यात, असे सांगितले. हेडलीला भेटणारा राजाराम रेगे याचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विदेशी व्यक्तीला मी कधीही पंतप्रधान होऊ देणार नाही, असे सांगत ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या भविष्यातील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला आपला विरोध दर्शवला.
राज ठाकरेंबाबत बोलताना ते म्हणाले, त्याने शिवसेना सोडण्याचे मला खूप दुर्‍ख झाले. त्याला मी अंगाखांद्यावर खेळवलेय. पण नेतृत्व त्याच्या डोक्यात गेले होते. तो आक्रमक होता. आता त्याला परत ट्रॅकवर आणणे कठीण आहे. तो शिवसेनेत परत येणार नाही. राज माझी नक्कल करतोय. पण उद्धवला स्वतर्‍ची शैली आहे, अशी टीकाही बाळासाहेबांनी केली. छगन भुजबळ यांनी स्वार्थासाठी शिवसेना सोडली. मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नाही तर आम्हीच त्यांची हकालपट्टी केल्याचे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा