मुस्लिमांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदूंना संघटित
व्हावेच
लागेल, असे शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब
ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, तसेच त्यांचे पुतणे राज ठाकरे हे व्यंगचित्रकाराचा त्यांचा वारसा पुढे चालविणार असल्याचे, शिवसेनाप्रमुख म्हणाले.
शिवसेनेच्या मुखपत्रात गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत सुरू आहे. काल प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. व्यंगचित्रकाराची तुमची भूमिका कोण पुढे नेऊ शकते, याबाबत विचारले असता बाळासाहेब म्हणाले, वारसा कोण पुढे नेऊ शकतो, याबाबत मला वाटतेय माझा हा वारसा राज पुढे नेऊ शकतो. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि लालकृष्ण अडवाणी यांचे चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी एकदम योग्य आहेत, असेही शिवसेनाप्रमुखांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा